भिंतीचित्र व चित्रकला स्पर्धेत प्रथम

0
28

गोंदिया दि. १0: नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्र संचालक व स्थानिक वनसंरक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध ठिकाणी भिंतीचित्र व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. भिंतीचित्र स्पर्धेत उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे संचालित प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच चित्रकला स्पर्धेत किरण तिलक बाणेवार प्रथम, विजय राजेश्‍वर कटरे याने द्वितीय क्रमांक पटकाविला. तर सोनी फुलसुंगे, वैभव मेश्राम, लोकेश नखाते, पालेंद्र गावळ यांना प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आईवडील, संस्थाध्यक्ष पंकज कटकवार, निरज कटकवार, चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य अभय गुरव, ओ.टी. रहांगडाले, कुमुदिनी तावाडे व सर्व शिक्षकांना दिले.