गोंडवाना विद्यापीठात २९ पदे रिक्त

0
6

गडचिरोली दि.१८: चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी २ आॅक्टोबर २०११ रोजी सुरू करण्यात आलेल्या गडचिरोलीस्थित गोंडवाना विद्यापीठात एकूण २९ पदे रिक्त आहेत. यामुळे विद्यापीठाच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र घेण्यासाठी व इतर शैक्षणिक कामांसाठी वारंवार विद्यापीठात चकरा माराव्या लागत आहे.

गोंडवाना विद्यापीठात वर्ग १ ते ४ ची एकूण १६४ पदे मंजूर आहेत. यापैकी सरळसेवा भरतीने १२९ व पदोन्नतीने १० असे एकूण १३५ पदे भरण्यात आली आहे. सध्य:स्थितीत गोंडवाना विद्यापीठात पदोन्नतीची २५ व सरळसेवेचे ४ असे एकूण २९ पदे रिक्त आहेत.

गोंडवाना विद्यापीठात वर्ग १ ची उपकुलसचिवाचे एक पद, सहाय्यक कुलसचिवाचे दोन पदे रिक्त आहेत. वर्ग २ ची अधीक्षकांची दोन पदे रिक्त आहेत. वर्ग ३ मधील निवडश्रेणी लिपीक सहा, उच्च श्रेणी लिपीक आठ, निम्म श्रेणी लिपीक सहा पदे रिक्त आहेत. वर्ग १ व २ ची पदे रिक्त असल्याने एकाच अधिकाऱ्याला अनेक टेबलावरील कार्यभार सांभाळावा लागत आहे.