परिसर मुलाखतीतून वायसीसीईच्या ४00 विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी

0
16

नागपूर दि.२४: यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (वायसीसीई) अंतिम वर्षातील ४00 विद्यार्थ्यांना परिसर मुलाखतीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांकरिता सप्टेंबर महिन्यापासून परिसर मुलाखतीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते. २0१५-१६ सत्राकरिता नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांनी वायसीसीई येथे ९ ते ३0 सप्टेंबर या कालावधीत परिसर मुलाखतीच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये केपजेमिनी, टीसीएस, टेक महिंद्रा, इनॉटिक्स, सायबेज, झेन्सॉर, परसिस्टन्ट, इन्फोसेप्ट, इन्फोस्ट्रेच या बहुराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. विविध पात्रता फेरीचे निकष आणि निवड प्रक्रियेतील काठिण्यपातळी यशस्वीरित्या पूर्ण करीत पहिल्याच फेरीत ४00 विद्यार्थ्यांनी या कंपन्यांमध्ये निवड निश्‍चित झाली आहे. महाविद्यालयातील ट्रेनिंग अँन्ड प्लेसमेंट विभागाकडून पाचव्या सत्रापासून विद्यार्थ्यांकडून परिसर मुलाखतीकरिता आवश्यक गुणवत्तेनुसार तयारी करून घेण्यात येते. शिवाय एडीसीसीमार्फत ८0 तासांच्या तासिका घेऊन विशेष मार्गदर्शन केले जाते. एनवायएसएसचे अध्यक्ष दत्ता मेघे, सचिव सागर मेघे, कोषाध्यक्ष आ. समीर मेघे यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून त्यांना चांगल्या भाविष्याकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी निवडीचे श्रेय प्राचार्य डॉ. उदय वाघे, प्लेसमेंट विभागाचे संचालक प्रा. जावेद शेख, मेघे ग्रुप ऑफ कॉलेजेसचे ट्रेनिंग विभागाचे संचालक डॉ. शंतनु खंडेश्‍वर, ट्रेनिंग अँन्ड प्लेसमेंट अधिकारी निरज वखरे यांना दिले आहे. ट्रेनिंग अँन्ड प्लेसमेंट विभागातील प्रा. जावेद शेख, निरज वखरे, प्रा. मनीष हडप हे अधिकाधिक विद्यार्थ्यांना परिसर मुलाखतीच्या माध्यमातून संधी मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहेत.