नवीन शिक्षण प्रणालींतर्गत जिल्हास्तरीय सर्वेक्षण

0
17

गोंदिया दि.३१: मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरणासंबंधी जिल्हास्तरीय सर्वेक्षण धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांच्या उपस्थितीत बुधवार (दि.२८) पार पडले.
याप्रसंगी जिल्हा नोडल अधिकारी व प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने गटचर्चांवर शासकीय आदेशानुसार सर्वेक्षणाचे प्रारूप व इतर विषयांवर माहिती दिली. तसेच सर्वेक्षणासाठी देण्यात आलेल्या गटांवर उपस्थितांसमोर प्रकाश टाकला. डॉ. दिलीप चौधरी यांनी सर्वेक्षणाची कालर्मयादा याविषयावर मार्गदर्शन केले. या सर्वेक्षणात नवीन शैक्षणिक धोरण निश्‍चितीकरिता गटचर्चा घेण्यात आली. यासाठी उपस्थित मान्यवरांना पाच गटांत विभाजित करण्यात आले. विविध क्षेत्रातील महानुभावांना प्रत्येक गटांचा गटप्रमुख म्हणून निवडण्यात आले.यात दीपम पटेल, अँड. मेठी, अजय वडेरा, पुरूषोत्तम मोदी, अनिल दरयानी यांचा समावेश होता.
सदर गटप्रमुखांनी आपापल्या गटात सहकार्‍यांसह गुणवत्तेसाठी शासनाच्या सुधारणा, संस्थेचे क्रमांक व अधिस्वीकृती, विनिमयाच्या गुणवत्तेत सुधारणा, केंद्रीय संस्थांची पाऊले मांडण्याची भूमिका, राज्यलोक विद्यापीठ सुधारणा, उच्च शिक्षणातील कौशल्य विकासाबाबत एकात्मता, ऑनलाईन बढती, तंत्रज्ञानाधारित अध्ययनाच्या संधी, प्रादेशिक विषमता आदी विषयांवर चर्चा करून सर्वेक्षण सादर करण्यात आले. यात शैक्षणिक प्रणाली नावीण्यता व्यवहार्य व सुसंगत सूचनांचे एकत्रीकरण करण्यात आले.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा जिल्ह्यातील क्षेत्रियस्तर, तालुकास्तर व जिल्हास्तरीय समन्वयक अधिकार्‍यांच्या सहकार्याने सदर उपक्रमाला सबलीकरण प्रदान करण्यात आले.या सर्वेक्षणामध्ये जिल्हाभरातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, उच्च शिक्षणाशी संबंधित शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, डॉक्टर्स, पत्रकार, वकील, पालक, विद्याथर्ीे संघप्रमुख, प्राध्यापकवृंद, माजी विद्यार्थी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, शैक्षणिक समितीचे सदस्य, स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख, विद्यार्थी तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, औद्योगिक आदी क्षेत्रातील अनुभवी उपस्थित होते.
प्रास्ताविक व संचालन डॉ. शीतल बॅनर्जी व डॉ. दिलीप चौधरी यांनी केले. आभार डॉ.एच.आर. त्रिवेदी यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांच्या मार्गदर्शनात सर्व शिक्षक व शिक्षकेतरांनी सहकार्यकेले.