एक्युटपब्लिक शाळेत शिक्षक दिवस साजरा

0
54

गोंदिया,दि.06ः-दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एक्यूट पब्लिक शाळेत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती ‘ शिक्षक दिवस ‘ च्या रुपात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांद्वारे डा. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेवर माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.

याप्रसंगी विद्यार्थ्यांद्वारे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.ज्यात गीत, भाषणे, नाटिका, नृत्य, राधाकृष्णन यांच्या जीवनातील उत्कृष्ट प्रसंग सादर करीत गुरुचे महत्व सांगण्यात आले.यावेळी संज्योत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या प्रेरणास्त्रोत श्रीमती गीताताई भास्कर,सहसचिव श्रीमती शुभा शहारे,शाळेचे प्राचार्य मनीषा शुक्ला, पर्यवेक्षक प्रविणकुमार मेश्राम आणि शिक्षिक उज्ज्वला पारधी, अनिता नेवारे,शाहीना अहमद, श्रीमती माधुरी मेश्राम, ललिता कुथे, खुशबू तुरकर, रागिणी शाहू, विद्या कोरे, तसेच शिक्षकेत्तर दिक्षा जांभूळकर उपस्थित होते.    उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना राधाकृष्णन यांच्या जीवनाशी अवगत करून त्यांच्या चरित्रावर वाटचाल करण्याची प्रेरणा दिली व शिक्षकदिवसाचे महत्व पटवून देत मार्गदर्शन केले.