देवरी येथे महिलांसाठी आरोग्य आणि कायदेविषयक शिबिर उत्साहात

0
23

देवरी,दि.06-  स्थानिक सीताराम लॉन येथे काल रविवारी महिलांसाठी आरोग्य आणि कायदेविषयक शिबीराचे आयोदन उत्साहात पार पडले.

या शिबिराच्या अध्यक्षस्थानी देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे हे होते. यावेळी मंचावर मार्गदर्शक म्हणून माजी जि.प.सदस्य संदीप भाटीया, डॉ. लतिका गायकवाड, अॅड. मुकेश शहारे,उमेदचे अतुल मुरकुटे, सीमा कोरोटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवर पाहुण्यांनी उपस्थित महिलांना आरोग्य विषयक आणि कायदेविषयक बाबींवर मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाचे संचलन प्रदीपकुमार मोहबंशी यांनी केले. उपस्थितांचे आभार पाथोडे यांनी माानले. शिबीराच्या यशस्वितेसाठी पचशीला गांगुर्डे, आशा राऊत, प्रीती उजवणे यांनी सहकार्य केले. यावेळी तालुक्यातील संपूर्ण उमेद महिला बचत गटातील सदस्यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.