जिल्ह्यातील १८९ शाळांनी पुकारला संप

0
6

 

गोंदिया ,दि.१0: विविध मागण्यांना घेऊन जिल्ह्यातील अनुदानित व विनाअनुदानित अशा १८९ शाळांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. जिल्ह्यातील २५ विनाअनुदानित तर १६४ अनुदानित अशा १८९ शाळा या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.
सन २0१३-१४ या वर्षातील संच मान्यता रद्द करावी, जुनी पेंशन योजना लागू करा, शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे काढा, विना अनुदानित शाळांना अनुदान द्या अश्या मागणीला घेऊन जिल्ह्यातील १८९ शाळा बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यातील ४0 जार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. या शाळाआजही बंद राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समिती व इतर शिक्षक संघटनांच्या वतीने पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना आल्या पावली परत जावे लागले. मात्र शहरी भागासह ग्रामीण भागातही अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी या बंदमध्ये सहभागी होण्यास नकार देत शिक्षकांना शाळेत बोलवून घेतले. त्यामुळे जिल्ह्यात या शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
शाळा बंदला सालेकसा तालुक्यात १00टक्के प्रतिसाद मिळाला. ९ डिसेंबर रोजी तालुक्यातील सर्व खासगी अनुदानित माध्यमिक शाळा बंद ठेवून शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली. शाळेला कुलूप लावून मुख्याध्यापकासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेच्या प्रांगणात बसून राहीले.