आज पवनीत शिक्षक परिषदेचे जिल्हा अधिवेशन

0
15

पवनी : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे भंडारा जिल्हा अधिवेशन शनिवार २६ व २७ डिसेंबरला नगर पालिका कनिष्ठ महाविद्यालय, पवनी येथे आयोजित करण्यात आले आहे.
२६ ला सायंकाळी ७ वाजता शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे तक्रार निवारण शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षक परिषदेचे नागपूर विभाग अध्यक्ष डॉ. उल्हास फडके, उपाध्यक्ष के.के. वाजपेयी यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. २७ ला सकाळी ८.३0 वाजता अध्यात्म आणि शिक्षण या विषयावर वक्ते डॉ. गजानन डोंगरवार व शिक्षणातील परिवर्तन आणि आवाहने या विषयावर वक्ते डॉ. संजय पोहरकर यांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता अधिवेशनाचे उद््घाटन नागपूर विभागाचे शिक्षक आम नागो गाणार हस्ते डॉ. उल्हास फडके यांच्या अध्यक्षतेखाली स्वागताध्यक्षा न.प. अध्यक्षा रजनी मोटघरे, खा. नाना पटोले, आ. रामचंद्र अवसरे, आ. चरण वाघमारे, पुर्तीचे संचालक अनिल मेंढे, विलास काटेखाये, आ. अनिल सोले, आ. रामनाथ मोथे, दिपक गोखले, सुवर्णमाला थेरे, शिक्षणाधिकारी के.झेड. शेंडे, प्राचार्य प्रमोद धार्मिक, प्राचार्य अनिल राऊत, प्राचार्य एच.के. देशमुख आदींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या अधिवेशनाला शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष अशोक वैद्य यांनी केले आहे.