नाकाडोंगरी राईस मिलचे अध्यक्ष पायउतार

0
13

तुमसर : राईस मिल सोसायटीच्या विद्यमान सदस्यांना विश्‍वासात न घेता मनमर्जीने कार्यभार चालवित असल्याचा अध्यक्षांवर ठपका ठेवत सदस्यांनी अविश्‍वास दर्शविला होता. त्यानुसार झालेल्या विशेष सभेत सात सदस्यांचे मतदान अध्यक्ष विरोधात गेल्याने राईस मिलचे अध्यक्ष अखेर पायउतार झाले.
तालुक्यातील दि नाकाडोंगरी को ऑफ राईस मिल सोसायटी लि. नाकाडोंगरी र.नं. ६७२ या सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून खुशाल नारायण पुष्पतोडे यांच्याकडे कार्यभार मिळताच त्यांनी एक छत्री कार्यक्रम आखून विद्यमान नवनिर्वाचित सदस्यांना विश्‍वासात न घेता मनमर्जीने कारभार करणे सुरू केले होते. अशातच जिल्हा उद्योग संघ भंडारा येथे स्वत:चेच नाव प्रतिनिधी म्हणून पाठविले होते.
जेव्हा दि.२९ एप्रिल २0१२ च्या मासिक सभेत ठराव पारित करून बाळकृष्ण गाढवे यांचे नाव जिल्हा उद्योग संघाचा प्रतिनिधी म्हणून पाठवावे असे ठरले होते. ही बाब ईतरही सदस्यांच्या लक्षात येताच जिल्हा उपनिबंधकाकडे सदस्यांनी तक्रार नोंदवून अविश्‍वास दर्शविला होता.
त्यानुसार जिल्हा उपनिबंधकाने अविश्‍वास संदर्भात विशेष सभा बोलावून मतदान घेतले असता अध्यक्ष पुष्पतोडे यांच्या विरोधात एकूण नऊ सदस्यापैकी मुक्ता सोनवाने, ईश्‍वर गौपाले, बाळकृष्ण गाढवे, रतिराम खुने, किशोर गौपाले, उमाशंकर परबते, हेमराज सिरसाम असे सात सदस्यांनी मतदान केले.