परीक्षा पूर्व परवानगीचे 200 तर कार्योतर परीक्षा परवानगीचे 173 प्रकरणे मंजूर

0
18

*मूकाअ अनिल पाटील यांच्या दालनात शिक्षक समितीने घडवून आणली चर्चा*

सडक अर्जुनी:-(महेंद्र टेंभरे):– महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे शिष्टमंडळ शिक्षकांच्या समस्येबाबत मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल पाटील यांच्या दालनात भेट घेवून विविध मागण्यांचे निवेदन देवून चर्चा केली व तत्काळ समितीच्या निवेदनाची दखल घेत प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी यांना दिले.

जिल्हा परिषद अंतर्गत प्रलंबित असणाऱ्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने शिक्षक समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्या दालनात विविध प्रश्नांवर चर्चा घडवून आणीत प्रकर्षाने मा.उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्देशानुसार 1500 रुपये नक्षलभत्ता व अतिरिक्त घरभाडेभत्ता लागू करणे सोबतच प्रलंबित उच्च परीक्षा परवानगी, संगणक सूट, हिंदी मराठी सुट ,कार्योतर परीक्षा परवानगी, चटोपाध्याय -निवडश्रेणी प्रकरणे या अनुषंगाने चर्चा घडवून आणली असता तातडीने सर्व प्रकरणे निकाली काढण्याची निर्देश मुकाअ यांनी शिक्षणाधिकारी यांना दिले.यानंतर शिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे यांच्या दालनात शिक्षक समिती पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवर सविस्तर चर्चा घडवून आणली परिणामतः उच्च परीक्षा परवानगीचे 200 प्रकरणे,कार्योतर परीक्षा परवानगीचे 173 प्रकरणे ,हिंदी मराठी सुट संदर्भातील 16 प्रकरणे ,संगणक सूट संदर्भातील 06 प्रकरणे तातडीने मंजूर करीत शिक्षक समितीच्या निवेदनाची दखल घेतल्याबद्दल शिक्षक समिती पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, शिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे यांचे जाहीर आभार मानले सोबतच 21 मार्च पासून उन्हाची तीव्रता बघता सकाळ पाडीत शाळा लावण्याची मागणी केली असता लवकरच यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले.

यावेळी शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार ,राज्य कार्यकारिणी सदस्य संदीप तिडके, जिल्हा सरचिटणीस संदीप मेश्राम, तालुकाध्यक्ष नीलकंठ बिसेन, दीपक लांजेवार आदि पदाधिकारी उपस्थित होते.