राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेत ७४ बालकांवर हृदय शस्त्रक्रिया

0
11

२३४ बालकांवर अन्य शस्त्रक्रिया

गोंदिया, दि. १६ : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वर्ष २०१३-१४ पासून अद्यापपर्यंत ४६० बालकांची हृदय शस्त्रक्रिया व ३४०७ बालकांची इतर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पुर्ण करण्यात आलेले आहे. तसेच वर्ष २०२१-२२ मध्ये ७४ बालकांची हृदयशस्त्रक्रिया व २३४ बालकांची इतर शस्त्रक्रिया पुर्ण करण्यात आलेली आहे. या योजनेची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी करण्यात येत आहे.

आजची बालके उद्याची भविष्य आहेत. उद्याचे भविष्य असणाऱ्या बालकांचे आरोग्य सुदृढ असावे म्हणून महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वर्ष २०१३-१४ पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सन २०१३ पासून गोंदिया जिल्हयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची यशस्वी अमलबजावणी सुरु आहे. जिल्हयातील सर्व आंगणवाडी केंद्र व शासकिय व निमशासकिय शाळा तसेच आश्रम शाळेमधील ० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांची या योजने अंतर्गत कार्यरत २० वैद्यकिय पथकामार्फत नियमित वैद्यकिय तपासणी करण्यात येते. किरकोळ आजारी लाभार्थ्यांना सदर ठिकाणीच औषधोपचार करण्यात येते. गंभीर आजार आढळणाऱ्या लाभार्थ्यांना पुढील तपासणी करीता वेळोवेळी संदर्भ सेवा शिबिराचे आयोजन जसे २-D-ECHO Camp, Bera test, MRI, इ. चाचण्या करण्यात येतात व काही लाभार्थ्यांना DEIC (district Early intervetion centre) मध्ये संदर्भित करण्यात येते. तपासणी दरम्यान आढळलेले लाभार्थ्यांना शस्त्रक्रिया करीता राज्य स्तरावरुन सामंजस्य करार झालेले मोठ्या रुग्णालयात संदर्भित करुन आवश्यक उपचार व शस्त्रक्रिया निशुल्क करण्यात येतात.

लवकर निदान व लवकर उपचार तसेच निशुल्क उपचार राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वर्ष २०१३-१४ पासून अद्यापपर्यंत ४६० बालकांची हृदयशस्त्रक्रिया ब ३४०७ बालकांची इतर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पुर्ण करण्यात आलेले आहे. तसेच वर्ष २०२१-२२ मध्ये ७४ बालकांची हृदयशस्त्रक्रिया व २३४ बालकांची इतर शस्त्रक्रिया पुर्ण करण्यात आलेली आहे. कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरीता योग्य नियोजन करण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, निवासी वैद्यकिय अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा लेखा व्यवस्थापक जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक तसेच संपुर्ण जिल्हयातील कार्यरत पथकातील सर्व वैद्यकिय अधिकारी-कर्मचारी यांचे सहकार्याने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणीL करण्यात येते. दरवर्षी १०० टक्के उद्दिष्टे पुर्ण करण्यात येतात, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मोहबे यांनी केले आहे.