गुजराती नॅशनल हायस्कूल प्रयोगशाळेचे नविनीकरण

0
17

गोंदिया दि.८: : गुजराती नॅशनल हायस्कूल व एस.एम. पटेल कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान प्रयोगशाळेचे नविनीकरण करण्यात आले. उद््घाटन गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून अमृत परमार, दीपम पटेल, जयेश पटेल, विजय जोशी, प्राचार्य रिझवाना अहदम, मुख्याध्यापक विनोद चव्हाण, मुख्याध्यापिका अमिता श्रीवास्तव उपस्थित होते. या वेळी दीपम पटेल व जयेश पटेल यांनी वर्षा पटेल यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. वर्षा पटेल यांनी संपूर्ण परिसराचे निरीक्षक केले व प्रत्येक वर्गात जावून विद्यार्थ्यांशी चर्चा केली. याप्रसंगी प्रोजेक्टरद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम व अत्याधुनिक इन्फ्रास्ट्ररची माहिती जयेश पटेल यांनी सांगितली. पटेल यांनी ई-लर्निंगचेही निरीक्षण केले.