तंबाखू, दारूमुक्तीसाठी समिती गठित: जिल्हाधिकारी समितीचे अध्यक्ष

0
17

गडचिरोली दि.८::तंबाखू व दारू याच्या सेवनामुळे होणार्‍या दुष्परिणामावर उपाय करणे , तंबाखू व दारूसेवन न करण्याबाबत राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १२ सदस्यांचा कार्यगट तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली १२ सदस्यांची समिती गठित करण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ४ जानेवारी रोजी घेतला आहे.

जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहणार असून सदस्यांमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, उपायुक्त अन्न व औषध प्रशासन, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा वनाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, शिक्षणाधिकारी, तंबाखू व दारूबंदी क्षेत्रात काम करणार्‍या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व सर्च संस्थेच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

जिल्ह्यातील हे विदारक वास्तव सर्वेक्षणातून सर्च संस्थेचे संचालक डॉ. अभय बंग यांनी राज्य शासनापुढे मांडले. तसा आकडेवारीसह शासनाला अहवालही सादर केला. या अहवालानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबाखू व दारूमुक्तीसाठी कार्यगटाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.