राष्ट्रीय फेस्टिव्हलसाठी प्रोगेसिव्हची निवड

0
10

 गोंदिया दि.16: उमादेवी बहुउद्देशिय शिक्षण संस्थेद्वारे संचालित प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यायातील आठ विद्यार्थ्यांची नवरगाव नॅशनल आर्ट फेस्टिव्हल-१0१६ साठी निवड करण्यात आली. आर्ट फेस्ट्रीवल ८ ते १0 जानेवारी या कालावधीत घेण्यात आला असून त्यात प्रोग्रेेसिव्हच्या विद्यार्थ्यांनी कॅनव्हासवर आपल्या अप्रतिम कलाकृती सादर करुन प्रोग्रेसिह चित्रकला महाविद्यालयाचे नाव लेव्हल वर उंचावले. त्यात संपूर्ण भारतातून म्हणजे मुंबई. दिल्ली, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, भोपाल, नागपूर, अकोला, जळगाव, चंद्रपूर, चित्रापूर आदीे शहरातील नवोदित कलाकारांनी सहभाग घेऊन आपली कला कॅनव्हासवर रेखाटून सर्वांना मंत्रमुग्ध ेकेले. मुंबईचे सुप्रसिद्ध कलाकार वासुदेव कामत व भोपालचे सुप्रसिद्ध प्रिन्टमेकर युसूफ यांनी आपल्या कुंचन्यातून हेमोस्टेशन देऊन विद्यार्थ्थांना काही महत्वपूर्ण माहिती नवोदित कलाकारांना दिली. यशासाठी पंकज कटकवार, निरज कटववार, ओ.टी. रहांगडाले, अभय गुरव, कन्हैया आंबेडारे, स्मिरण बास्के, विलास नागदेवे, राकेश पहिरे यांनी सहकार्य केले.