स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत रंगभरण स्पर्धेचे आयोजन

0
45

गोंदिया,दि.11ः- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. जिल्हाधिकारी नयना गुंडे व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्या प्रेरणेतून, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ.महेंद्र गजभिये व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रदीप समरीत यांच्या मार्गदर्शनात अणि पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, उपसभापती निरज उपवंशी व गटविकास अधिकारी डॉ वेदप्रकाश चौरागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षण विभाग पंचायत समिती गोंदिया व जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत गटशिक्षणाधिकारी जे.एस. राऊत यांच्या कल्पनेतून दिनांक-13 ऑगस्ट 2022 ला श्री गुजराती नेशनल हायस्कूल रेलटोली गोंदिया येथे 3500 विद्यार्थ्यांचे रंगभरण स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.
यामध्ये इयत्ता १ते १२चे विद्यार्थी सहभागी असून त्यांची तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. इयत्ता १ ते ४ चा पहिला गट वेळ-सकाळी ८.३० ते ९.३० असून टिंबाव्दारे तिरंगा ध्वज तयार करून रंग भरणे. इयत्ता ५ ते ८ (दुसरा गट) वेळ-सकाळी १० ते ११ विषय – स्वातंत्र्याचा लढा व इयत्ता ९ ते १२ (तिसरा गट) वेळ सकाळी ११.३० ते १२.३० विषय- २१व्या शतकातील भारत अशाप्रकारे गटनिहाय विद्यार्थ्यांना विषयावर चित्र काढून रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या रंगभरण स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गटसमन्वयक विनोद परतेके, केंद्रप्रमुख केदारनाथ गोटेफोडे, केंद्रप्रमुख मोरेश्वर बडवाईक, केंद्र प्रमुख नरेंद्र डहाके व कैलाश खोब्रागडे हे प्रयत्नशील आहेत.