पगाराविनाच गेली शिक्षकांची दिवाळी

0
12

गोंदिया : दिवाळी पूर्वीच राज्यातील शिक्षकांचे वेतन देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र केवळ आठ जिल्ह्यातील शिक्षकांना तुटपुंजा पगार मिळाला. तब्बल २६ जिल्ह्यातील शिक्षकांची दिवाळी पगाराविनाच गेली यात गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश आहे.
राज्य शासनाने जिल्हा परिषद,नगर परिषद तसेच खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍ांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्याचा निर्णय १८ ऑक्टोबर रोजी निर्गमित करण्यात केला. प्रत्यक्षात वेतन अनुदान जिल्हास्तरावर वर्ग करतांना केवळ ६0 टक्केच रक्कम पाठविली गेली. त्यामुळे २६ जिल्ह्यांना दिवाळीपूर्वी वेतन शिक्षकांच्या बँक खात्यात जमाच करता आले नाही तर केवळ साता, नागपुर, सिंधुदुर्ग आणि अहमदनगर या चार जिल्हा परिषदांमधील शिक्षकांना जुन्या शिल्लक अनुदानाच्या आधारावर वेतन मिळाले.
याशिवाय वाशीम, सांगली, बिड आणि र%ागिरी या चार जिल्ह्यांमध्येही शिक्षकांचे वेतन अदा केले गेले. मात्र, तेथेही अध्र्या तालुक्यातील शिक्षकांना अनुदाना अभावी वंचित ठेवले गेले. त्यामुळे दिवाळी सारख्या सणाला हाती पैसा नसल्याने शिक्ष्क,कर्मचार्‍यांमध्ये संताप पसरला आहे.
राज्य शासन दवर्षी खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या वेतनासाठी १00 टक्के अनुदान पाठविते. मात्र, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांचे अनुदान देतांना आखडता हात घेतला जातो. महिन्याच्या पहिल्याच तारखेला वेतन अदा रण्याचा शासन निर्णय निर्गमित करून आता पाच वर्षां पेक्षा अधिक काळ लोटला आहे.तरी एकाही महिन्यात एक तारखेला वेत अदा करण्यात आलेली नाही.

हे जिल्हे राहीले वंचित
गोंदिया जिल्ह्यासह भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, पुणे, सोलापुर, कोल्हापुर, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, औरंगाबाद, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, जालना, पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार व हिंगोली या जिल्ह्यांमध्ये वेतन अनुदान कमी आल्याने एकाही शिक्षकाला दिवाळीपूर्व वेतन मिळाले नाही.