२0 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद पाडल्या

0
14

गोंदिया : डॉ.पंजाबराव देशमुख रा.शि.प. जिल्हा शाखा गोंदिया व महाराष्ट्र व पुरोगामी शिक्षक संघटनेच्यावतीने २0 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या शासन निर्णया विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
शासनाच्या तुघलकी निर्णयामुळे ग्रामीण भागातील वस्ती, तांडा व गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य शासनाने डावावर लावले आहे. गोंदिया जिल्ह्यातील २१७ शाळा, तर राज्यातील एकूण १२000 हजार शाळा बंद होणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कित्येक किलोमीटर प्राथमिक शिक्षणासाठी जावे लागणार आहे. सर्वांना शिक्षण मिळावे हे शासनाचेच धोरण असून त्या धोरणालाच शासन पाठ दाखवित आहे. शिक्षक अतिरिक्त झाले तर ते कुठेतरी समायोचित होतील. पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्य काय याचे उत्तर शासनाचेच द्यावे असा आक्रोश मोच्र्यातून दिसून आला. सदर आंदोलनाला शिक्षक भारती संघटना, ओबीसी सेवा संघ, मराठा सेवा संघ व अनेक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला. सदर आंदोलनात प्राजक्ता रणदिवे, पी.एन. पटले, राजू चामट, प्रफुल्ल ठाकरे, एच.बी. राऊत, हरीराम येळणे, आर.जी. शहारे, अनिता भुसारी, सावन कटरे, एन.सी. बिजेवार, नरेंद्र गौतम, एन.डी. जिभकाटे, एन.एस. चौरे, मनीष मेश्राम, डी.आर. अंबादे, आर.एन. मेश्राम, आर.जी. नागपुरे, एम.एल. भगत, एन.एन. खांडेकर, एस.आर. नागपुरे, एम.एल. कटरे, के.एफ. खांडेवाहे, के.एन. बोपचे, व्ही.एस. नेवारे, जी.एस. बिसेन, आर.बी. बिसेन, पी.डी. चव्हाण, एस.बी. कटरे, देवचंद बिसेन यांचा समावेश होता.