पूर्णा पटेल :युवांना संघटित क रून नव्या दिशेने कार्य

0
10

गोंदिया : शेतकर्‍यांच्या हिताच्या गोष्टी करणारे आता सत्तेत आल्यानंतर शेतकर्‍यांना विसरले आहेत. शेतकरी विरोधी या शासनाला शेतकर्‍यांच्या हितार्थ काम करण्यास जागृत करावे लागणार आहे. यासाठी युवा शक्ती संघटित करून आम्ही नव्या दिशेने कार्य करणार असल्याचे प्रतिपादन पूर्णा पटेल यांनी केले. तालुका राष्ट्रवादी, युवक व विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ताबैठकीत त्या गुरूवारी (दि.३) बोलत होत्या.

आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत या बैठकीला जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्‍वरी, प्रदेश प्रतिनिधी देवेंद्रनाथ चौबे, जिल्हा बँक संचालक राजू एन.जैन, तालुका पर्यवेक्षक अशोक गुप्ता, तालुकाध्यक्ष कूंदन कटारे, बाळकृष्ण पटले, जिल्हा महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, जिल्हा युवा अध्यक्ष किशोर तरोणे, जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष केतन तुरकर व अन्य उपस्थित होते. याप्रसंगी आमदार जैन यांनी, येणार्‍या काळात प्रत्येक गावात नव्याने सर्व घटकांची नवी बूथ कमिटी गठन करून कार्य करणार असल्याचे सांगीतले.
याप्रसंगी तालुता युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने विविध पदांवर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकार्‍या पूर्णा पटेल यांच्या ६गस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. तर तालुका विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने विविध पदाधिकार्‍यांची यावेळी नियुक्ती करण्यात आली. संचालन तालुका युवक अध्यक्ष जितेश टेंभरे यांनी केले. आभार अंचल गिरी यांनी मानले.
बैठकीला तालुकाध्यक्ष छोटू पटले, जिल्हा परिषद सदस्य भोजराज चुलपार, खुशबू टेंभरे, रजनी गौतम, अखिलेश सेठ, विद्यार्थी अध्यक्ष सौरभ गौतम, शैलेश वासनिक, किर्ती पटले, प्रकाश देवाधारी, तिर्थराज हरिणखेडे, जगदीश बहेकार, तुळशीराम शिवणकर, रामू चुटे, मदन चिखलोंढे, बाबा परगवार, डॉ. सुरेश कावळे, रामकृष्ण गौतम, शिवलाल नेवारे, पुरण उके, पवन पटले, मोनू बैस, शेखर कोहळे, रंजीत टेंभरे, कान्हा बघेले, डॉ. ओमप्रकाश मदारकर, राजेशसिंह परिहार, रवि जतपेले, सोनू येळे, रजत मान, शुभम गौतम, डॉ. प्रदीप रोकडे, डॉ. विनोद पटले, चंदन गजभिये, बबलू बघेले, महेंद्र बघेले, नितीन टेंभरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.