नक्षलवाद्यांनी केली माजी नक्षलवाद्याची हत्या

0
9

गडचिरोली, दि.१६: नक्षलवाद्यांनी त्यांच्याच एका माजी सहकारी नक्षल्याची हत्या केल्याची घटना काल रात्री चामोर्शी उपविभागांतर्गत पुसेर येथे घडली. किरण उर्फ कमकलाल निरंगू झुरी(४५) असे मृत इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण झुरी हा पूर्वी पोटेगाव दलमचा सदस्य म्हणून कार्यरत होता. खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीररित्या हत्यार तसेच स्फोटके जवळ बाळगणे अशा अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याने चामोर्शी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हे दाखल करुन अटक केली होती. त्यानंतर जामीनावर सुटका झाल्याने तो गावात शेती व मजुरीचे काम करीत होता. मात्र नक्षलवाद्यांनी त्याची हत्या केली. पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी त्याची हत्या केल्याचा अंदाज आहे. परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.