‘जागरुक पालक सुदृढ बालक’अभियानाचा शुभारंभ

0
16

सालेकसा:तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भजेपार येथे स्थानिक आरोग्य उपकेंद्र, ग्राम पंचायत आणि अंगणवाडी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागरुक पालक सुदृढ बालक’ या अभियानाचा शुभारंभ सरपंच चंद्रकुमार बहेकार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. दरम्यान आरोग्य जपण्यासाठी काय करावे आणि काय करू नये यावर उपस्थितांना मार्गदर्शन करून आरोग्य तपासणी करण्यात आली.
आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात ‘जागरुक पालक सुदृढ बालक’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून लाखो विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने भजेपार येथील जिल्हा परिषद शाळा आणि सर्व अंगणवाडी केंद्रात हे अभियान राबवून बालकांची आरोग्य तपासणी उप केंद्राचे सीएचओ डॉ. दिनेश कटरे, आरोग्य सेविका विद्या बहेकार – बोहरे यांनी केली आहे. अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ग्राम पंचायत भजेपारच्या उपसरपंच कुंदा ब्राह्मणकर, शाळा समितीचे अध्यक्ष टेकचंद बहेकार, समिती सदस्य रेवत मेंढे, ग्रा.पं. सदस्य रविशंकर बहेकार, रेवतचंद बहेकार, राजेश बहेकार, मनीषा चुटे, सरस्वताबाई भलावी, आत्माराम मेंढे, आशा शेंडे, ममता शिवणकर, मुख्याध्यापिका एम एम देवरे, केंद्रप्रमुख डी. व्ही. भुते, जि.एन तुरकर, एन. जी. घासले, आर.एम. भोयर, व्ही.एस. मेश्राम, अंगणवाडी सेविका कल्पना बहेकार, वच्छाला ब्राह्मणकर, शिक्षण स्वयंसेवक अरुण कोठेवार आदी उपस्थित होते.आशा सेविका रामिता ब्राह्मणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.