पालडोंगरीच्या जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

0
17

तिरोडा,दि.13ः- तालुक्यातील पालडोंगरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन उत्साहात करण्यात आले.या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य पवन पटले होते.उद्घाटन सरपंच चंद्रकुमार चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.दोनदिवसीय संमेलनाचे नियोजत अध्यक्ष गणराज रहागंडाले हे होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलतांना जिल्हा परिषद सदस्य पवन पटले यांनी,कुुठल्याही कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या गावाच्या विकासाकरीता काय करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे असून आपण त्याकरीता प्रयत्नशील आहोतच.सोबतच गावातील काही समस्या व मागण्या असल्यास सविस्तर सांगावे ते आपण सोडविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार असल्याची गाव्ही दिली.तसेच  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मार्फत होणाऱ्या कामाची तक्रार खंडविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे,ती तक्रार नागरिकांनी मागे घ्यावे अशी विनंती जि.प.सदस्य पटले यांनी केली.

कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सितकूरा पटले सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष, भरत टेंभरे, हितेंद्र कटरे तंटामुक्त समिती अध्यक्ष, विनोद उईके उपसरपंच, टेंभरे बाई शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष, रेखलाल रहांगडाले, चंद्रकांत साबळे, दिलीपकुमार रहांगडाले, सलीम मरस्कोले, मुख्याध्यापक बिसेन सर, केंद्रप्रमुख हिरापुरे सर, पटले सर, श्यामकूवर मॅडम, बनसोड सर, डुलेश रहांगढाले, शिवनीती संस्थेचे सदस्य, तंटामुक्त समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटी सदस्य, पाणी वाटप समिती सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माता पालक संघ, मान्यवर, गावकरी विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.