मॉडेल कॉन्वेंट एण्ड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगांव मध्ये विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन

0
17

गोरेगांव :- स्थानीय मॉडेल कॉन्वेंट एण्ड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगांवमध्ये आधुनिक युगाचे वैज्ञानिक सी.व्ही.रमण यांच्या जयंती निमित्त विज्ञानप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य छाया पी. मेश्राम अध्यक्ष तसेच शाळेचे संस्थापक प्रा.आर.डी.कटरे हे उद्घाटक म्हणुन उपस्थित होते. त्याचबरोबर शाळेचे प्रशासकीय अधिकारी सी.बी.पटले तसेच स.शि.एस.एच.शुक्ला हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.सि.व्ही.रमण यांचा जन्मदिवसाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष,उद्घाटक, प्रमुख अतिथी यांनी सी.व्ही.रमण यांच्या जिवनावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.त्याचबरोबर आयोजित विज्ञान प्रदर्शनी बद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन कु श्रृष्टि मिश्रा, कु. वैष्णवी मडावी तसेच आभार कु. निधी कटरे हिने मानले.