एस. एस. गर्ल्स कॉलेज गोंदिया “एचएससी बोर्ड चा उत्कृष्ट निकाल”

0
22

गोंदिया -शिक्षण संस्था अंतर्गत संचालित एस. एस. गर्ल्स कॉलेजचा एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल 80 टक्के लागला कॉलेजच्या विज्ञान शाखेचा निकाल 94 टक्के तर कला शाखेचा निकाल 70 टक्के लागला.

विज्ञान शाखेतील कु. श्रुती मोहन प्रसाद तिवारी 86% , कु. रिया विकास कापसे 78% ,कु. यामिनी देवराज बिसेन 69.33% तर कला शाखेमधून कु.हिना महेश लांजेवार 78%, कु. यामिनी गजानन उमरे 73. 17 टक्के ,कु. प्राची राजेंद्र मेश्राम 68% प्राप्त केले महाविद्यालयाकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

गोंदिया शिक्षण संस्थेचे संरक्षक प्रफुल पटेल, अध्यक्षा वर्षाताई पटेल, सचिव राजेंद्र जैन,संचालक निखिल जैन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.के.बहेकार यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले तसेच कॉलेजचे प्रा.संजय कळंबे, प्रा.भारती खरवडे,प्रा.डॉ.दिशा गेडाम,प्रा. ओमप्रकाश नागपुरे, प्रा. कविता वरखडे, प्रा.अरविंद कानतोडे, प्रा. दिलीप कठाने,प्रा. लालाजी सपाटे प्रा. कांचन भांडारकर, प्रा.संगीता सहारे, प्रा.डहाके व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून उज्वल भविष्यात च्या शुभेच्छा दिल्या .