“शोध क्षमतेचा, ग्रामीण ऊर्जेचा” व्याख्यानमाला सत्रास अंतर्गत विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

0
8

15 व्या सत्राचे यशस्वी आयोजन

 गोंदिया, दि. 26 : केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत नोकर भरतीच्या अनुषंगाने जाहिराती प्रकाशित करण्यात येतात. गोंदिया जिल्हा हा नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल भागात मोडत असून, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विविध विभागाच्या नोकरभरतीच्या जाहिरातीच्या अनुषंगाने विस्तृत माहिती नसते, त्याकरीता विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती, विविध विभागाच्या पदांच्या अनुषंगाने परीक्षेची तयारी कशी करावी, त्याकरीता आवश्यक बाबीं विषयी तज्ञ वक्त्यांमार्फत मार्गदर्शन करणे व विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरीता जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीने सन 2018-19 या वर्षापासून नाविण्यपुर्ण उपक्रम “शोध क्षमतेचा, ग्रामीण ऊर्जेचा” ही स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला सुरु करण्यात आलेली आहे.

 सदर व्याख्यानमाले अंतर्गत प्रत्येक महिन्यात दर शुक्रवारला तज्ज्ञ वक्ते व अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात येते. त्यानुसार सदर व्याख्यानमालेच्या 15 व्या सत्राचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे करण्यात आलेले होते. सदर व्याख्यानमालेकरीता रुपेशकुमार राऊत, जिल्हा सांख्यिकी अधिकारी हे प्रमुख मार्गदर्शक उपस्थित होते.

या प्रसंगी मार्गदर्शक वक्ते रुपेशकुमार राऊत, जिल्हा सांख्यिकी अधिकारी यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना विद्यार्थ्यांनी त्यांची बलस्थाने व कमकुवत बाजू काय आहेत हे ओळखून त्यानुसार अभ्यास करावा तसेच संबंधित परीक्षेचे अभ्यासक्रम, प्रश्नांचे स्वरूप, त्याकरीता आवश्यक संदर्भिय क्रमिक पुस्तके इत्यादींचे अवलोकन व वाचन करणे आवश्यक असल्याचे तसेच चालु घडामोडीबाबत दैनिक वर्तमानपत्रे, मासिके व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिकांचा वापर करण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच विविध विभागाच्या पदांच्या भरतीसंदर्भात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे शंकाचे निरसन यावेळी करण्यात आले.

  श्री रुपेशकुमार राऊत, जिल्हा सांख्यिकी अधिकारी यांनी प्रकाशित केलेली “राज्यसेवा पुर्व परीक्षा वन स्टॉप सोल्युशन्स सामान्य अध्ययन भाग-2 (पर्यावरण व पारिस्थितिकी, राज्यव्यवस्था आणि शासन व भारतीय अर्थव्यवस्था” पुस्तक अभ्यासिकेस भेट दिली. सदर व्याख्यानमालेत जिल्ह्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद मोहतुरे, सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले. सदर व्याख्यानमालेचे संचालन श्रीमती स्वाती कापसे, समाज कल्याण निरीक्षक यांनी तर आभार प्रदर्शन लक्ष्मण खेडकर यांनी केले. सदर मार्गदर्शन सत्राच्या यशस्वितेसाठी लक्ष्मण खेडकर, कु.ज्योती फुंडे, अमित रंगारी व क्रिस्टल कंपनीचे कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्याख्यानमालेच्या पुढील सत्राचा लाभ घेण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.