गोरेगाव,दि.१९ः-गोरेगाव तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव 2024 25 स्पर्धेचे आयोजन श.जा.ति. जि. प. हायस्कूल गोरेगाव येथे १६ आँगस्टला करण्यात आले. या नाट्योत्सवाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी डी.टी.कावळे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विस्तार अधिकारी एच.एम.बोपचे आणि गटसाधन केंद्र गोरेगाव चे सर्व विषय साधन व्यक्ती यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.शिक्षण विस्तार अधिकारी डी.टी. कावळे यांनी अध्यक्षीय भाषणात विज्ञान नाट्योत्सवाचे महत्व स्पष्ट करीत विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी अशा अनेक माध्यमातून निर्माण केल्यास त्यांच्या मनातील भिती दूर होईल असे सांगितले.यावेळी उपस्थित मान्यवरांनीहीं समयोचित मार्गदर्शन केले.
नाट्य उत्सवात तालुक्यातील विविध शाळांतील एकूण 23 स्पर्धक चमुंनी सहभाग घेतला. सदर स्पर्धक चमुंनी दृक श्राव्य माध्यमांच्या सहाय्याने दिलेल्या विषयावर आधारित विज्ञान नाट्याचे सादरीकरण केले. परीक्षक म्हणून व्याख्याता कु.ए. ए. गोतमारे,आर.वाय.गजभिये व एन डी.राठोड यांनी कामगिरी पार पाडली.नाट्योत्सवाच्या निकालानुसार नवप्रतिभा हायस्कूल दवडीपारच्या चमूने प्रथम क्रमांक पटकावला.तर द्वितीय व तृतीय क्रमांकावर अनुक्रमे एम.सी.पी.कॉन्व्हेंट गोरेगाव चमू व श.जा.ति. जि.प. हायस्कूल गोरेगावच्या चमूची निवड झाली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श.जा.ति.जि.प.हाय. गोरेगाव येथील कर्मचारीवृंद तसेच गटसाधन केंद्र गोरेगाव येथील सर्व विषय साधनव्यक्ती व इतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.प्रास्ताविक विषय साधनव्यक्ती भास्कर बाहेकर यांनी केले. संचालन विषय साधनव्यक्ती ओमप्रकाश ठाकरे यांनी तर आभार विषय साधनव्यक्ती सुनिल ठाकुर यांनी मानले.