जुन्या पेंशनकरीता 29 ऑगस्टपासून राज्य शासकीय, निम्न शासकीय कर्मचारी संपावर

0
5006

गोंदिया,दि.१९ः– महाराष्ट्र राज्यातील राज्य शासकीय निम्न शासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय व हक्काची मागणी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतच्या शासनाच्या उदासीन धोरणामुळे राज्यातील सर्व कर्मचारी वर्गात तीव्र असंतोषाचे भावना निर्माण झालेली आहे जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीचा इतर मागण्या तात्काळ निघाली काढण्यात यावात यासंदर्भात तील शासनाला दिलेल्या नोटीस नुसार राज्यातील सर्व विभागाचे शासकीय निम्न शासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासून संपावर जात असल्याचे निवेदन आज मध्यवर्ती समन्वय समिती च्या माध्यमातून जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मुरगानंथम यांना देण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की मागील अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विधानसभेत निवेदन करून कर्मचाऱ्यांना आस्वस्थ केले होते की जुन्या पेन्शनचे सर्व लाभ तत्वतः मान्य करून नवीन पेन्शन योजना राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येईल या नवीन योजनेमध्ये जुन्या योजनेत समाविष्ट असलेले सर्व लाभ दिले जातील व लवकरच याकरता गठीत केलेली समिती आपला अहवाल देऊन जुन्या पेन्शन प्रमाणेच लाभ देणारी नवीन पेन्शन योजना राज्यात लागू केली जाईल या आश्वासनानंतर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती समन्वय समिती च्या सुकाणू समितीने राज्यात उभारलेला संप स्थगित केला होता मात्र आज रोजी पर्यंत सुद्धा शासनाने आपला शब्द पूर्ण केला नाही त्यामुळे पुन्हा कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष उफाळून आला आहे त्याचे परिणाम स्वरुप पुन्हा संपाची हाक राज्य कर्मचाऱ्यांनी दिली आहे यानुसार शासनाला संपाची नोटीस देण्यात आलेली असून त्यातीलच एक टप्पा म्हणून गोंदिया जिल्ह्यातील समन्वय समितीचे नेते लीलाधर पाथोडे ,कमलेश बिसेन जिल्हाध्यक्ष ,पी.जी.सहारे,चंदू वैद्य,राकेश डोंगरे ,आशिष रामटेके, संतोष तोमर ,भगीरथ नेवारे,नामपल्लीवार ,एन यू कावले ,संतोष तुरकर ,सुभाष खत्री ,गोवर्धन बिसेन ,यज्ञेश मानापुरे, कुमारी चित्रा ठेंगरी, आनंद चर्जे ,तेजस्विनी चेटूले, राजेश कुंभलवार ,गितेश तिजारे ,गोपाल शर्मा, मनोज मानकर ,टेकचंद चौधरी, अभिजीत बोपचे ,निखिल बागडे, प्रमोद काळे ,सौरभ अग्रवाल आदी शिष्टमंडळ मध्ये समाविष्ट होते.