गोंदिया,दि.१६ः महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळ मुंबई अंतर्गत घेण्यात येणार्या ओ.टी.टेक्निशीयन या अभ्यासक्रमाच्या परिक्षेचा निकाल लागला असुन या मध्ये एम.जी. पॅरामेडिकल काॅलेज मुर्री चैकी, गोंदियाला घवघवीत यश प्राप्त झालेले आहे.जुन 2024 मध्ये झालेल्या परिक्षेमध्ये सहभागी विद्यार्थ्यापैकी कु.रविना मार्कंड रोकडे या विद्यार्थीनीने 77.83ः गुण घेऊन विदर्भात प्रथम क्रमांक पटकाविला.त्यापाठोपाठ कु. सलोनी रामलाल बांबोळे 76.17,सनतलाल मौजीलाल तेलासे 76.00,कु.इमलेश्वरी कमल सिहोरे 72.67,कु.यमुना तोशलाल मच्छीरकेने 71.33टक्के गुण घेऊन यश संपादन केलेला आहे.
जिल्ह्यात पॅरामेडिकल क्षेत्रात अग्रणी असलेल्या एम.जी. पॅरामेडिकल काॅलेजला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळ मुंबईची मान्यता असुन दरवर्षी अनेक विद्यार्थी शासकीय नौकरीसाठी निवडले जातात.विद्यार्थ्यांनी आपले यशाचे श्रेय काॅलेजचे संचालक अनील गोंडाणे व पालकांना दिले आहे.या यशासाठी प्राचार्य अनुसया लिल्हारे, प्रा. प्रीती वैद्य, प्रा. ललीतकुमार डबले, प्रा. रामेश्वरी पटले प्रा. छाया राणा, प्रा. आरती राऊत, प्रा. मनीष चैधरी, प्रा. गायत्री बावनकर,राजु रहांगडाले,सौरभ बघेले,राजाभाऊ उंदिरवाडे,श्रीमती योगेश्वरी ठवरे, व श्रीमती रूपाली धमगाये यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.