गोरेगाव,दि.१५ः तालुक्यातील झांजिया येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या परिसरात गावातीलच काही हुडदंग्या युवकांनी होळीच्या दिवशी किचनशेड व परिसरातील साहित्याची तोडमोड करुन उलटी व शौच केल्याचे प्रकरण आज 15 मार्च रोज शनिवारला उघडकीस आले.आज सकाळची शाळा असल्याने शाळा उघडताच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लीलावती देवलाल पटले यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली.शाळेच्या परिसरातील विद्यार्थ्यांच्या स्वयंपाक खोलीचे पत्राचे तोडफोड करण्याचे प्रकरण अनेकदा या शाळेमध्ये घडले आहे.मात्र होळीच्या दरम्यान शाळेच्या स्वयंपाक घरात दारू पिऊन उलट्या आणि शौच कुणी करते काय अशा प्रश्न उपस्थित करीत गावातील नागरिकांना माहिती देण्यात आली.आता ते हुडदंगी युवक व्यक्ती कोण याचा शोध गावकरी घेऊ लागले असे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लीलावती देवलाल पटले यांनी सांगितले.यावेळी मुख्याध्यापिका पि. एच. नागपुरे, व्ही. के.जाधव, एल. एल. हरिनखेडे, एन. डी. हरिनखेडे, उषा मेश्राम, छन्नू राऊत शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.