जलजिवनच्या मुद्यावर माजी अध्यक्ष धावले ईई बेलपात्रेच्या मदतीला

0
770

गोंदिया,दि.२९ःजिल्हा परिषदेच्या नव्या पदाधिकार्यांच्या कार्यकाळातील पहिल्याच सर्वसाधारण सभेत माजी बांधकाम सभापतीने जलजिवन मिशनच्या कामाना घेत अनियमितता व निकृष्ठ कामे होत असल्याचा आरोप केल्याने खळबळ माजली.सत्तेत पदावर असताना बांधकाम सभापतीनी मात्र जलजिवन मिशनच्या कामावर चुप्पी साधली होती,मात्र पदावरुन पायउतार होताच सर्वसामान्य सदस्यासारंखे प्रश्न उपस्थित करुन ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याना धारेवर धरले.जलजिवन मिशनच्या कामात कुठलीच अनियमितता नाही,व्यवस्थित होत असून लहानमोठ्या वृत्तपत्राच्या पत्रकारांनी उपस्थित केलेल्या गोष्टीकडे लक्ष द्यायची गरज नाही,जलजिवन मिशनची कामे चांगली सुरु असल्याचे सांगत माजी जि.प.अध्यक्षांनी आपल्याच पक्षाच्या सदस्याचे प्रश्न खोडत काढत कार्यकारी अभियंता बेलपात्रे यांची बाजू घेतल्याने जिल्हा परिषदेच्या वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली जि.प.सभागृहात २८ मार्च रोजी पार पडली.यासभेला जि.प.उपाध्यक्ष सुरेश हर्षे,मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगांथम,महिला बालकल्याण सभापती पौर्णीमा ढेंगे,अर्थ व बांधकाम सभापती डाॅ.लक्ष्मण भगत,समाजकल्याण सभापती रजनी कुंभरे,कृषी व पशुसंवर्धन सभापती दिपा चंद्रिकापूरे उपस्थित होते.सभेला सुरवात होताच जि.प.सदस्य संजय टेंभरे यांनी जलजिवन मिशनच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुमित बेलपात्रे उभे होऊन जि.प.अध्यक्ष यांना उद्देशून मा.अध्यक्ष सदस्यांना गप्प करावे असे बोलल्याचे सुत्रांनी सांगितले.सभागृहातील जि.प.सदस्य हे मान्यवर असून सदस्यांना गप्प व शांत करावे असा एकेरी उल्लेख करुन कार्यकारी अभियंत्यानी सभागृहातील प्रश्न उपस्थित करणार्या सदस्याचाच नव्हे तर सभागृहातील सर्वच सदस्याचा अवमान केल्याची चर्चा सुरु झाली आहे.जलजिवन मिशनच्या कामात अनियमिततेच्या बातम्या अनेक वृत्तपत्रांनी प्रकाशित करुन शासनाचे लक्ष वेधण्याचे काम केले होते.मात्र माजी जि.प.अध्यक्ष पकंज रहागंडाले यांनी कार्यकारी अभियंत्याची बाजू घेतांना वृत्तपत्र व पत्रकारांना महत्व देण्याचे गरज नसल्याचे बोलल्याची चर्चा आहे.