27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home शैक्षणिक शिष्यवृत्ती प्राप्त न झालेल्या विद्यार्थ्यांनी तात्काळ आपले आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न...

शिष्यवृत्ती प्राप्त न झालेल्या विद्यार्थ्यांनी तात्काळ आपले आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावे

0
53

गोंदिया, दि.0२ : अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाकडुन संयुक्तपणे भारत सरकार मॉट्रीकोत्तर शिष्यवृती प्रदान केली जाते. शैक्षणिक वर्ष 2022-23 ते 2024-25 या कालावधीत 45 हजार विद्यार्थ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न नसल्यामुळे केंद्र शासनाच्या PFMS प्रणालीद्वारे शिष्यवृत्तीची रक्कम वितरीत करण्यात अडचणी येत आहेत. याकरीता नागपूर विभागातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे बैंक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची प्रक्रिया https://www.npci.org.in पोर्टलवरील Bharat Aadhaar seeding Enabler (BASE) प्रणालीद्वारे विशेष मोहिम राबवून तातडीने पूर्ण करून घेण्याच्या सूचना प्रसाद कुळकर्णी, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग नागपूर यांनी नागपूर विभागातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांना दिल्या आहेत.

शैक्षणिक वर्ष 2022-23 ते 2024-25 या कालावधीतील केंद्र हिस्सा 60 टक्के वितरणासाठी प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांचा डेटा QR कोडवर उपलब्ध आहे. यामध्ये विद्यार्थ्यांकडून https://www.npci.org.in प्रणालीचा वापर करून आधार बैंक लिंक स्थिती पूर्ण करावी. तद्नंतर महाविद्यालय स्तरावर त्याची खातरजमा करुन त्याचा डेटा त्वरीत दिलेल्या QR कोडचा वापर करुन जिल्हा व महाविद्यालय निवडावे. या डेटा लिंकचा वापर करण्याकरीता Pass@ १२३ हा पासवर्ड टाकून महाविद्यालयनिहाय व विद्यार्थीनिहाय माहिती अद्यावत करावी. जेणेकरून सदर डेटा केंद्र शासनास फेरसादर करता येईल. यामूळे आधार संलग्न नसलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम त्यांचा बँक खात्यात जमा करण्याची प्रकिया केंद्र शासनाकडून लवकरात लवकर सुरु होईल.

अनुसूचित जातीचा कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास महाविद्यालयावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. अधिक माहितीकरीता संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.