गोरेगाव:जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संख्या-गोंदिया द्वारे आयोजित “लोकसंख्या शिक्षण” उपक्रमांतर्गत भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. शजातिजिप हायस्कूल गोरेगांव च्या विद्यार्थ्यांनी भूमिका अभिनयात प्रथम आले असून त्यांची विभागस्तरा साठी निवड झाली आहे आणि लोकनृत्याल तिसऱ्यास्थानावर यश संपादन करून शाळेचा नाव लौकिक केले.भूमिका अभिनयाचे “हिंसा से सुरक्षा” या विषयावर नाटिका लेखन व दिग्दर्शन सावन कटरे यांनी केले असून पर्यावरण संरक्षण लोकनृत्याचे मार्गदर्शन व संयोजन कु. एस.जी. मुनेश्वर, कु. बी. व्ही. येडेकर यांनी केले.यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन डायटचे प्राचार्य राजकुमार हिवारे, नरेश वैद्य, शाळेचे मुख्याध्यापक-सुनिल हरिणखेडे, सुभाष मारवाडे, दिनेश अंबादे, वजेंद्र खापर्डे, प्रभाकर रहांगडाले, श्रीकांत नंदेश्वर,पुनम करसायाल ,रंजना पळसकर व समस्त शिक्षकवृंदाने केले असून पुढिल वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.





