23.5 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home शैक्षणिक 8 व्या केंद्रीय वेतन आयोगासोबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची बैठक

8 व्या केंद्रीय वेतन आयोगासोबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची बैठक

0
448

_संघटनेद्वारे विविध विषयांवर सादर केलेल्या प्रेझेन्टेशनची आयोगाकडून दखल व कौतुक.

गोंदिया,दि.०५ः पुणे येथे 8 व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधिश श्रीमती रंजना देसाई,आयोगाचे सदस्य सचिव पंकज जैन (IAS) व अन्य सर्व कार्यकारी सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या शिष्टमंडळाने अनेक प्रमुख बाबींवर चर्चा केली.
चर्चेच्यावेळी प्रामुख्याने जुन्या पेन्शन मागणी सह,5 फॅमिली युनिट फॉर्म्युला, 3.8 फिटमेंट फॅक्टर,किमान वेतन 65,000 रु, HRA दरवाढ व HRA तील त्रुटी, ग्रॅच्युटी वाढ, विविध पेन्शन रिफॉर्म , इन्क्रीमेंट सुधारणा , विशेष वेतनवाढ पुनर्स्थापना , 10,20,30 कालबद्ध वेतनवाढ मधील अल्प वेतनवाढ व त्यातील वेतनत्रुटी, शिक्षकांना 10,20,30 लागू करणे इत्यादी अशा 16 प्रमुख विषयांवर PPT च्या माध्यमातून आयोगासमोर सादरीकरण करण्यात आले. 8 व्या वेतन आयोगात वरील सर्व विविध लाभ लागू करण्याची मागणी करण्यात आली.
आयोगाने सर्व मुद्दे समजून घेतले , संघटनेकडून मांडण्यात आलेले विषयांची आयोगाने गांभीर्याने नोंद घेतली.यावेळी शिष्टमंडळात संघटनेचे राज्यसचिव गोविंद उगले, राज्य सोशल मीडिया प्रमुख व सादरकर्ते विनायक चौथे, पुणे जिल्हाध्यक्ष बबनराव म्हाळसकर, राज्य प्रवक्ते जितेंद्र फापाळे , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ कुदळे, जिल्हा पदाधिकारी आनंद लोंढे इत्यादी उपस्थित होते..
संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनात आणि संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष आशुतोष चौधरी, कोषाध्यक्ष प्रवीण बडे, मिलिंद सोळंकी, सल्लागार सुनील दुधे, सहसचिव अरविंद पुलगुर्ले व सर्व राज्य टीम इत्यादिंचे सहकार्य व मार्गदर्शन आजच्या बैठकीसाठी लाभले.

blank