23.3 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home विदर्भ गॅस सिलेंडर टंचाई व काळाबाजार विरोधात तिरोडा काँग्रेसचे निवेदन

गॅस सिलेंडर टंचाई व काळाबाजार विरोधात तिरोडा काँग्रेसचे निवेदन

0
102

चित्रा कापसे/तिरोडा- स्थानिक संकेषा गॅस एजन्सीकडून ग्राहकांना गॅस सिलेंडर वितरणात मागील काही दिवसांपासून होत असलेली अनियमितता, सिलेंडरची टंचाई तसेच सुरू असलेल्या कथित काळाबाजाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने तिरोडा तहसीलदारांसोबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.ही बैठक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी तिरोडा शहर व ग्रामीण भागातील अनेक गॅस ग्राहकांनी उपस्थित राहून एजन्सीविरोधात विविध तक्रारी मांडल्या. ग्राहकांना वेळेवर गॅस मिळत नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

काँग्रेसच्या प्रतिनिधीमंडळाने तहसीलदारांसोबत सविस्तर चर्चा करत सर्वसामान्य नागरिकांना गॅस सेवा सुरळीत व वेळेत कशी उपलब्ध होईल यावर विचारमंथन केले. तसेच गॅस वितरण व्यवस्थेत तातडीने सुधारणा करून ग्राहकांना नियमितपणे सिलेंडर मिळावा, यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.या बैठकीला नगरसेवक परमानंद पारधी, तिरोडा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश टेंभरे, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक ओम पटले, माजी सभापती वाय.टी. कटरे, शिवा यादव, श्यामराव खोब्रागडे, पत्रकार राधेश्याम नागपुरे, सरपंच सुभाष वाडीचार तसेच अरविंद येडे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

blank