गोंदिया: गणखैरा येथील किरसान इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या इयत्ता बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.या वर्षी लागलेल्या सीबीएसई (CBSE) बारावी बोर्ड परीक्षेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवले आहे. यामध्ये हर्षील जांभुलकर याने ७८.८० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. तसेच गायत्री भंडारी (७४.८० टक्के), निहाली दिहारे (७१ टक्के), मुरलीधर गावडे (६९.८० टक्के) आणि कार्तिक घासले (६३.८० टक्के) हे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे कार्यकारी संचालक ॲड. दुष्यंत किरसान, व्यवस्थापकीय संचालिका सीमा किरसान श्री गुरुदेव आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुभाष चुलपार आणि शाळेचे प्राचार्य अनिल कुमार राव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सर्व मान्यवरांनी आणि शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी खूप-खूप शुभेच्छा दिल्या.





