गोंदिया,दि.०१- येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधिक्षक म्हणून निलेश सुरेश लोधी यांनी कार्यभार स्विकारला आहे. भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन र्निमाण करण्यासाठी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग कटिबध्द असल्याचे लोधी यांनी कळविले आहे.भ्रष्टाचारमुक्त गोंदिया जिल्हयासाठी नागरीकांनी पुढे येऊन तक्रारी दाखल कराव्यात. भ्रष्टाचारमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
गोंदिया जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय कार्यालयात लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधवा त्याबाबत तक्रारदार यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल. प्राप्त तक्रारीची पडताळणी करुन लाच मागणा-या लोकसेवका विरुध्द आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.भ्रष्ट्राचार विरुध्दच्या लढयात नागरीकांचे सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे. “लाच देउ नका व लाच घेउ नका आणि लाच मागितल्यावर तक्रार करा” हा संदेश समाजात रुजवीण्यासाठी सर्व नागरीकांनी पुढाकार घ्यावा. भ्रष्टाचारमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी सहकार्य करावे असेही उप अधिक्षक लोधी यांनी म्हटले आहे.
तक्रार करण्यासाठी संपर्क माध्यमः कार्यालय पत्ताः लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, गोंदिया तिरोडा रिंग रोड, रेल्वे चौकी जवळ ता. जि. गोंदिया पिन कोड 441614.
दुरध्वनी क्र. 07182-251203
व्हाटसअप क्रमांक 9209041064
टोल फ्रि नं. 1064





