40.6 C
Gondiā
Monday, June 15, 2026
Home शैक्षणिक विदर्भातील पद्मश्रींचा विद्यापीठ करणार नागरी सत्कार

विदर्भातील पद्मश्रींचा विद्यापीठ करणार नागरी सत्कार

0
24

blank

-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखालील बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन
नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने विदर्भातील पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा नागरी सत्कार केला जाणार आहे. सिव्हिल लाईन परिसरातील वसंतराव देशपांडे सभागृहात रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी नागरी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सत्कार मूर्तींमध्ये पद्मश्री श्री. शंकर बाबा पापळकर, पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम, पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, डॉ. स्मिता कोल्हे, पद्मश्री डॉ. विलास डांगरे, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, पद्मश्री सत्यनारायण नुवाल व पद्मश्री जनार्दनपंत बोथे यांचा समावेश आहे. माननीय कुलगुरू डॉ‌. मनाली क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत नागरी सत्कार कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला प्र-कुलगुरु डॉ. अखिलेश पेशवे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी श्री. हरीश पालीवाल यांच्यासह सत्कार समिती सदस्य आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी ८ मार्च २०२५ रोजी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. नागरी सत्कार समारंभाची रूपरेषा ठरविण्याबाबत अधिसभा सदस्य ॲड. मनमोहन बाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली श्री अजय अग्रवाल, डॉ. राजेश भोयर,विष्णू चांगदे, डॉ. योगेश भूते, डॉ. अजय चव्हाण,डॉ. श्रीकांत भोवते, डॉ. चंदू पोपटकर,दिनेश शेराम,सुनिल फुडके, राहुल हनवते, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग संचालक डॉ. संभाजी भोसले, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांचा समावेश असलेल्या समितीचे गठन करण्यात आले होते. अधिसभेने घेतलेल्या निर्णयानुसार बैठकीत कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. समिती सदस्य आणि संबंधित अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत नागरी सत्कार कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.