र्मयादेशिवाय समाज परिवर्तन अशक्य – संत बांगळूबाबा

0
17

गोंदिया, दि. १४ –: ज्याप्रमाणे विश्‍व योगदिन साजरा करून जगभरात योगद्वारे स्वत:ला निरोगी ठेवण्याचा मंत्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला आहे. त्याचप्रमाणे विजयादशमी दिवस र्मयादा पुरुषोत्तम रामचंद्र यांचे आदर्श व सिद्धांत जिवंत ठेवण्याकरिता ‘र्मयादा दिवस’ म्हणून साजरा करावा व भारतीय संस्कृती जगात पोहोचवावी, असे उद्गार संत बांगळूबाबा यांनी व्यक्त केले.
श्री सद्गुरूनाथ शांतीधाम संस्कार सिंचन मंडळ ढाकणीच्या वतीने आयोजित ‘र्मयादा दिवसाचा शुभारंभ’ या कार्यक्रमासंदर्भात त्यांनी सांगितले. ते म्हणाले, आज पाश्‍चिमात्य संस्कृतीच्या आहारी जावून समाजात व्याभिचार व अराजकता वाढत चालली आहे. आम्ही आपल्या र्मयादेला विसरून चुकीच्या मार्गाचा स्वीकार केला आहे. भारतीय संस्कृतीचे वैभव कायम ठेवण्याकरिता रामाने दसर्‍याच्या दिवशी रावणासारख्या अंहकारी, अअर्धी महापंडिताला परास्त करून धर्माचे पालन केले होते. दसर्‍याच्या दिवशी केवळ रावणाच्या पुतळय़ाचे दहन करून आम्ही आपल्यात लपलेल्या रावणाचा अंत करू शकत नाही. यावर अंकुश ठेवण्याकरिता रावण दहन बंद करून विजयादशमीला ‘र्मयादा दिवस’ म्हणून साजरा करण्याची खरी गरज आहे.
हाउद्देश पुढे ठेवून, बांगळूबाबा आर्शम व श्री सद्गुरूनाथ शांतीधाम संस्कार सिंचन मंडळ ढाकणीच्या संयुक्त विद्यमाने १४ नोव्हेंबर रोजी ‘र्मयादा दिवस’ पाळला जाणार आहे. खा.नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद््घाटन होईल. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले उपस्थित राहणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीने केले आहे.