24.3 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण स्वागताने नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात!

विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण स्वागताने नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात!

0
34
गोंदिया,दि.३०ःआज गोंदिया शहरातील शाळांना प्रारंभ होत असल्याच्या निमित्ताने मरारटोली येथील नगर परिषद हिंदी पूर्व माध्यमिक शाळा तसेच सावित्रीबाई फुले मराठी माध्यमिक शाळा येथे आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमास नगराध्यक्ष सचिनभाऊ शेंडे यांनी उपस्थित राहून नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल आवड, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा, नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंदी वातावरणात व्हावी आणि प्रत्येक विद्यार्थी ज्ञानाच्या प्रवासात यशस्वी व्हावा, हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत मनापासून अभ्यास करण्याचे, चांगले संस्कार अंगीकारण्याचे आणि आपल्या कुटुंबासह गोंदिया शहराचे नाव उज्ज्वल करण्याचे प्रेरणादायी आवाहन करण्यात आले.यावेळी नगरसेवक अमर रंगारी,घनश्याम पानतवणे, माजी नगरसेविका ज्योतीताई फुंडे, शिक्षकवृंद, पालक, मान्यवर तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.