24.1 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home शैक्षणिक जि.प. अध्यक्ष व सीईओंची अचानक शाळाभेट

जि.प. अध्यक्ष व सीईओंची अचानक शाळाभेट

0
26

साखरीटोला : जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार यांनी साखरीटोला केंद्रातील जि.प. शाळा आणि अंगणवाडीला आकस्मिक भेट दिली. अंगणवाडी बंद होती. उपस्थित महिलांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

साखरीटोला येथील जि.प. हायस्कुल येथे भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगूज केले. वर्गावर्गात जाऊन विद्यार्थ्यांंना प्रश्न विचारले. जि.प.च्या शाळेतील मुलांचा गुणात्मक दर्जा काय आहे याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. इयत्ता नववीच्या विद्यार्थीनींनी राज्यघटनेची प्रस्तावना मुखपाठ बोलून दाखविली. ही प्रस्तावना भल्या भल्या लोकांना माहित नसते. मात्र विद्यार्थ्यांना प्रस्तावना पाठांतर असल्याचे लक्षात येताच विद्यार्थ्यांची प्रशंसा केली.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणाची अंमलबजावणी योग्य रितीने व्हावी व वर्गातील प्रत्येक विद्यार्थी प्रगत व्हावा, त्याला लिहिता वाचता यावे, याकरिता शिक्षकांनी कठोर परिश्रम करुन पोटतिडकीने विद्यार्थ्यांना शिकविले पाहिजे असे मत सीईओ पुलकुंडवार यांनी व्यक्त केले. उषाताई मेंढे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला. या आकस्मिक भेटीमुळे शिक्षकांमध्ये मात्र धडकी भरली होती.

blank