नवोदयच्या विद्यार्थ्यांना कमी पडल्या उत्तरपत्रिका

0
10

तिरोडा,दि. १४- तालुक्यातील पंचायत समितीचा शिक्षण विभाग गेल्या काही वर्षांपासून वाºयावर आहे. या विभागात नानाविध प्रकार सुरू असल्याचे वेळोवेळी उघड झाले. आठवडाभरापूर्वी पार पडलेल्या नवोदयच्या परिक्षेत शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या चुकीमुळे तब्बल ३६ विद्यार्थ्यांना अर्ज करून देखील परिक्षेपासून वंचीत राहावे लागले. ही बाब ताजी असताना परिक्षेच्या दिवशी कन्या शाळेतील परीक्षा केंद्रावर चक्क ४० परिक्षार्थ्यांना उत्तरपत्रिका कमी मिळाल्या. त्यांची पूर्तता गोंदियासह इतर केंद्रांवरून करण्यात आली. अशा प्रकारे हलगर्जी करणाºया अधिकारी आणि कर्मचाºयांना प्रशासन मोकाट का सोडतोच कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या शासन शिक्षणावर अधीक भर देत आहे. त्याकरिता शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रगत महाराष्ट्र हा त्यापैकीच एक आहे. आता हा कार्यक्रम अधीक गतीशील करण्याच्या दृष्टीने जलद प्रगत महाराष्ट्र हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. असे असताना मात्र याच विभागातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावरील अधिकारी आणि कर्मचारी हरताळ फासण्याचे काम करत असल्याचे लक्षात येत आहे. केंद्र शासनाच्या वतीने नवोदय विद्यालये चालविण्यात येतात. त्या विद्यालयामध्ये शिक्षणासह सर्व सुविधा मोफत दिल्या जातात. त्याकरिता दरवर्षी प्रवेशाकरिता परीक्षा घेण्यात येते.
तिरोडा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपल्याला नवोदय विद्यालयात प्रवेश मिळावा, यादृष्टीने वर्षभरापासून तयारी सुरू केली. शुल्कासह अर्ज शहीद मिश्रा विद्यालयात जमा केले. विद्यालयाने देखील ते अर्ज पंचायत समितीतील शिक्षण विभागात जमा करून त्याची पोचपावती घेतली. ८ जानेवारी रोजी त्याची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत शहीद मिश्रा विद्यालयातील ३६ विद्यार्थ्यांचे परीक्षा ओळखपत्र आले नसल्याचे एकच खळबळ उडाली.
शहानिशा केल्यानंतर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने ते अर्ज जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे पाठविलेच नसल्याचे उघड झाले. हा प्रताप डोळ्यासमोर असतानाच ८ जानेवारी रोजी तिरोडा येथीलच कन्या विद्यालयातील नवोदयच्या परीक्षेदरम्यान तब्बल ४० उत्तरपत्रिका कमी पडल्या. ऐनवेळी गोंदिया येथील आणि इतर परीक्षा केंद्रावरून उत्तरपत्रिकांची जुळवाजुळव करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याची परवानगी अधिकारी आणि कर्मचाºयांना दिली कुणी? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. कार्यतत्पर शिक्षणाधिकाºयांच्या कार्यकाळात असे प्रकार घडतात तरी कसे, हा संशोधनाचा विषय आहे.