विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उद्बोधन वर्गाचे आयोजन

0
26

सडक अर्जुनी,दि.21- शाहु, फुले, आंबेडकर पुरस्कार प्राप्त संत वांगळू बाबा आदिवासी शैक्षणिक सुधारणा मंडळ मालुटोला संस्थेच्या वतीने व संस्थापक जगदिश येळे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग १० ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी फुलिचंदजी भगत माध्यमीक व उच्च माध्यमीक विद्यालय कोसमतोंडी येथे प्रेरणादायी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रेरणादायी वर्गाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील प्राशिक्षक मनोज चौव्हान यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या शैैलितून एक सारखे पाच तास मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फृर्त प्रतिसाद दिला. या प्रेरणादायी वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कसा वाढवावा, परिक्षेची भिती कशी घालवावी, आपले ध्येय कसे गाठावे, आपल्यातील न्युगंडा दुर सारून विधायक विचार कसे वाढवावे, पाठांतरावर भर न देता विषय समजून घेण्यावर भर द्यावे, समुह वाचणावर भर घालावी, सुख मोठे केले की, दु:ख आपोआप लहान होते. परिक्षेची रणनिती आखुन अभ्यास करावा, मोठी स्वप्न बघावी अशा विविध विषयावर आपल्या अष्टपैलू शैलीने मनोज चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी देखील या मार्गदर्शनाच्या आपल्या विद्यार्थी जिवनात नक्कीच फायदा होईल असे मनोगत व्यक्त केले. तसेच कॉफीमुक्त अभियानाला फायदा होईल असे म्हणाले.