मकरधोकडा आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

0
18

गोंदिया,दि.20-जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील श्रीकृष्ण सहयोगी तंत्रशिक्षण संस्था देवरी अंतर्गत येणार्या स्वामी राधाकृष्ण आदिवासी आश्रमशाळा मकरधोकडाची इयत्ता पाचवीची विद्यार्थीनी दिपस्वी गणेशराव अरकराचा आज देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली.या मूलीच्या मृत्यूमूळे पुन्हा ही आश्रमशाळा चर्चेत आली आहे.यापुर्वी महिन्याभरापुर्वी याच आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याचा अशाच प्रकारे मृत्यू झाला होता.त्यापुर्वी जुर्ले 2012 मध्ये दोन विद्याथ्र्यांचा सर्पंदंशामूळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
सविस्तर असे की,मकरधोकडा येथील आश्रमशाळेत निवासी असलेल्या दिपस्वी अरकरा या मुलीची प्रकृती अचानक आज पहाटे ३.३० वाजता बिघडली.सुरवातीला तीन चार उलट्या झाल्याने लगेच शाळेचे मुख्याध्यापक व अधिक्षकांनी देवरी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.उपचार सुरु असताना प्रकृतीत सुधारणाही झाली परंतु अचानक सायकांळी ३.३० वाजेच्या सुमारास त्या मुलीची प्राणज्योत मालवल्याची माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाèयांनी दिली.शवविच्छेदन केल्यानंतरही मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याची माहिती वैद्यकिय अधिकाèयाने दिली आहे.
तर दुसरीकडे आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते चेतन उईके यांनी या सर्व प्रकरणाता आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रशासन व आश्रमशाळेचे प्रशासन दोषी असल्याचे म्हटले आहे.उईके यांनी मुलीच्या प्रकृतीकडे वेळीच लक्ष देण्यात न आल्यानेच तीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत यापुर्वी या आश्रमशाळेला बंद करण्याचे शासनाने आदेश दिल्यानंतर पुन्हा सुरु करण्याची परवानगी देण्यात आलीच कशी अशा प्रश्न उपस्थित करीत काही सत्ताधारी नेत्यामूळेच अशा आश्रमशाळा संचालकाना अभय मिळत असल्याचे सांगत याप्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मकरधोकडा आश्रमशाळेतील मुलीच्या मृत्यूबाबत आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विनोद चौधरी यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी सांगितले की मुलीची प्रकृती खालावताच तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान मुलीने चांगले वाटत असल्याचेही सांगितले,परंतु अचानक तीने प्राणसोडल्याने तिच्या मृत्यू झाला.डॉक्टरांनाही तिच्या मृत्यूचे कारण कळले नसल्याचे सांगत काही चुका शाळा प्रशासनाकडून झाल्या काय याचा तपास करण्यात येणार असल्याचे सांगितले.