31 C
Gondiā
Friday, July 10, 2026
Home Featured News वाणाच्या रूपात कचरा-सुप वाटून दिला स्वच्छतेचा संदेश

वाणाच्या रूपात कचरा-सुप वाटून दिला स्वच्छतेचा संदेश

0
26

गोंदिया,दि.21:- स्थानीय प्रभाग क्र. ६ च्या नवनिर्वाचित नगरसेविका भावना दिपक कदम यांनी आधार महिला शक्ती संघटनेच्या वतीने मकरसंक्रांतीचे औचित्य साधून परीसरातील महिलांना हळदी-कुंकूच्या माध्यमातून वाणाच्या रूपात १५०० महिलांना कचरा-सुपाचे वाटप करुन नवा पायंडा पाडला. आपल्या घरचा कचरा एकत्रित जमा करून-डस्टबीन मध्ये जमा करा व सिटी गाडीला देवून आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा असा संदेश नगरसेविका भावना दिपक कदम यांनी दिला. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत झालेल्या निवडणूकीत नगरसेविका भावना कदम यांनी केलेल्या कामाचे आधारे दुस-यांदा ४०० मतांनी निवडूण आल्या. आपला प्रभाग – सुंदर प्रभाग ही संकल्पना ठेवून त्या कार्य करतात मागील वर्षी त्यांनी परीसरातील महिलांना डस्टबिन चे वाटप केले होते हे विशेष.कार्यक्रमाच्या सफलतार्थ सुनंदा प्रिया सावंत, सिमा जाधव सुवर्णा कदम, श्रृती केकत, प्रती शेळके, कनिका अग्रवाल, कृपा कदम, बबीता ढाले, उमा महाजन, दिपा काशीवार, मिना डुकरे, योगीता लिल्हारे, पुनम लिल्हारे, शुभांगी कदम, पुजा तिवारी, रचना वैद्य, सुजाता बहेकार, माया राघोर्ते रिना यादव, मंजू दोनोडे, वंदना घाटे, सहीत अनेक महिलांनी सहकार्य केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व महिला साठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती हे विशेष. कार्यक्रमाची चर्चा परीसरात होती. नगरसेविका सौ. भावना कदम ने सर्वांचे आभार मानले.