सरस्वतीच्या शितलने पटकावला जिल्हास्तरीय विज्ञानस्पर्धेत प्रथम पुरस्कार

0
12

गोंदिया,दि.24:- शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात येथील सरस्वतीबाई महिला विद्यालयाची विद्यार्थीनी शितल पवनलाल टेंभरे या विद्यार्थींनीने प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी भरारी घेतली आहे.अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती विद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे पुरस्कारवितरण करण्यात आले,त्याप्रसंगी विद्यार्थीनी व मार्गदर्शक शिक्षिका अनिता तुरकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.शितलने सादर केलेल्या प्रयोगाचे नाव अन्न उत्पादन व सुरक्षा नवकल्पना असे होते.या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका वाघ,पर्यवेक्षक मुकुंद दिक्षित यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.