पेरमिली उपपोलिस ठाण्यात गावकऱ्यांनी केले हत्यार जमा

0
13

गडचिरोली,दि. २४: अहेरी उपविभागांतर्गत येणाऱ्या पेरमिली परिसरातील गावकऱ्यांनी २३ जानेवारी रोजी पेरमिली उपपोलिस ठाण्यात ६भरमार रायफल सिआरपीएफ अधिकाऱ्यांसमोर जमा केल्या.पोलिस विभागाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पेरमिली उपपोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या कार्यक्षेत्रातील गावकऱ्यांनी आपल्याजवळील हत्यारे पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे आवाहन केले होते. या आव्हानाला उत्तर देत कासमपल्ली येथील गावकर्यांनी आपल्याजवळील ६ भरमार रायफल पोलिसांच्या स्वाधीन केल्या.
यावेळी पोलिस उपनिरीक्षक बोंडे, निमगिरे, मोरे, सिआरपीएफच्या ९ व्या बटालियनचे असिस्टंट कमांडंट श्यामसिंग रावत उपस्थित होते. यावेळी पोलिस विभागाच्या वतीने सर्व गावकऱ्यांचे आदरातिथ्य करण्यात आले. त्यांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीसुध्दा गुर्जा येथील नागरिकांनी ४ रायफल पोलिसांच्या स्वाधीन केल्या होत्या.