नॉलेज पॉइंट अकॅडमी लाखनी तर्फे गुणवंतांचा सत्कार

0
8

लाखनी,दि.14- नॉलेज पॉइंट अकॅडमी लाखनी येथील इयत्ता दहावीच्या (SSC २०१७ च्या) विद्यार्थांचा निकाल १००% लागला असून एकूण ८५ पैकी ५० विद्यार्थी प्रविण्यप्राप्त श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
प्रियांशु आनंद वाधवानी या विद्यार्थाने गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत एकूण ९४.८० टक्के प्राप्त करून लाखनी तालुक्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच मुझम्मील सैय्यद या विद्यार्थ्याने गणित विषयात ९९ गुण, कु. देवयानी बेहलपांडे हिने गणित विषयात ९८ गुण, कु.नुपूर गरपडे हिने गणित विषयात ९४ गुण, वैभव तळेकर याने गणित विषयात ९२ गुण, संस्कार देशपांडे याने गणित विषयात ९१ गुण प्राप्त केले. या सर्व विद्यार्थांचा त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.यावेळी नॉलेज पॉइंट अकॅडमीचे संचालक श्री.अंगेश बेहलपांडे, श्री.किशोर वाघाये, श्री.श्याम पंचवटे, श्री. सुधीर काळे तसेच विशाल हटवार, प्रशांत वाघाये, लक्ष्मण बावनकुळे आणि नॉलेज पॉइंट अकॅडमी लाखनी मित्र परिवार यांनी सर्व गुणवंतांचे अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीसाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या.