कर्जाची परतफेड करण्यात महिलांचीच प्रामाणिकता- उषा मेंढे

0
16

आमगाव,दि.१४: केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ बचतगटातील महिलांनी घेतला पाहिजे. बचतगटातील महिला आता संघटीत झाल्या असून स्वावलंबनाच्या दृष्टीने त्या उद्योग व्यवसायाकडे वळत आहेत. बँकांनी आता त्यांना पूर्णपणे स्वावलंबी करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करुन दयावे. कारण महिला हया कर्जाची परतफेड प्रामाणिकपणे करतात. असे प्रतिपादन जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ,जिल्हा माहिती कार्यालय व तहसिल कार्यालय आमगावच्या संयुक्त वतीने येथील लक्ष्मणराव मानकर फार्मसी कॉलेज येथे आयोजित स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्र आमगावची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्याच्या उदघाटक म्हणून श्रीमती मेंढे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, माजी आमदार केशवराव मानकर, माजी जि.प.सभापती सविता पुराम, पं.स.सदस्य छबू उके, सिंधू भूते, गटविकास अधिकारी श्री.पांडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिलकुमार श्रीवास्तव, कनिष्ठ कौशल्य व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी सुरेश गणराज, उद्योग निरिक्षक श्री.राठोड, सामाजिक कार्यकत्र्या सविता बेदरकर उपस्थित होत्या.
श्रीमती मेंढे म्हणाल्या, घरच्या कत्र्या पुरुषाला आर्थिक सहकार्य करण्याचे कामही बचतगटातील महिला करतात. संकट काळात महिलेने जमा केलेला पैसा उपयोगी पडतो. एक-एक रुपयाची बचत करुन ती पैसा जमा करते. नोटबंदीच्या काळात महिलांनी खèया अर्थाने बचत केलेला पैसा उपयोगी पडला. माविमच्या माध्यमातून जिल्ह्यात महिलांच्या बचतगटाच्या स्थापनेतून महिलांचे मोठ्या प्रमाणात संघटन झाले आहे.आ.पुराम म्हणाले, पुर्वी चुल आणि मुल या क्षेत्रापुरत्या मर्यादित असलेल्या महिला आज विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने पुढे येत आहे. आज त्या व्यवहारासाठी बँकेत सुध्दा येत आहे. बँकांच्या मदतीमुळे महिला पुढे येवू लागल्या आहे. बेरोजगार, गरजू व महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ बँकांनी जास्तीत जास्त व्यक्तींना दयावा. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आदींनी बचतगटांच्या महिलांना शिशु गटातून कर्ज प्रकरणाचे मंजूरीपत्र तसेच प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या महिला लाभाथ्र्यांना गॅस कनेक्शनचे वाटप देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलवर असंख्य महिलांनी हिमोग्लोबीनची तपासणी केली व कमी हिमोग्लोबीन असलेल्या महिलांचे यावेळी समुपदेशन करण्यात आले. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंदू वंजारी, वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्वीनी जनईकर यांनी व त्यांच्या सहकाèयांनी पुढाकार घेतला.मान्यवरांच्या हस्ते स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्र आमगाव सन २०१६-१७ वार्षिक प्रगती अहवाल पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी गाव हागणदारीमुक्त करण्यात मोलाचे सहकार्य केल्याबद्दल उत्कृष्ट ग्रामसंस्था म्हणून महिला आघाडी ग्रामसंस्था बोरकन्हार, चैतन्य ग्रामसंस्था ठाणा, सर्वात जास्त कर्ज घेणार बचतगट म्हणून इंदिरा गांधी महिला बचतगट बिरसी, संगीनी महिला बचतगट आमगाव, उत्कृष्ट पशूसखी छाया ठाकरे, उत्कृष्ट सहयोगिनी शोभा तावाडे व संध्या पटले, उत्कृष्ट इंटरनेट साथी म्हणून तृप्ती बहेकार व दुर्गा बोपचे यांचा गौरवचिन्ह व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.
स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्र आमगावची वार्षिक सर्वसाधारण सभा देखील यावेळी संपन्न झाली. या सभेत सन २०१६-१७ चा प्रगती अहवाल मांडण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्ष शांता चंद्रिकापूरे होत्या. यावेळी कार्यकारीणीतील पदाधिकारी छाया ठाकरे, शोभा पटले, तृप्ती बहेकार, अरुणा बहेकार, वनिता मेहर, पुष्पा कुंभारे, उर्मिला शरणागत, चंदा बिसेन, शालू उके, नंदा तुरकर, खुरवंता चौधरी यांची उपस्थिती होती. साधन केंद्राच्या व्यवस्थापक आशा दखने यांनी अहवाल वाचन केले.यशस्वीतेसाठी सतीश मार्कंड, नामदेव बांगरे, श्री.पंचभाई, पुस्तकला खैरे, शोभा तावाडे, संगीता बोरकर, संख्या पटले, दिपा साखरे, दुर्गा बोपचे, रामेश्वर सोनवाने, प्रफुल अवघड, एकांत वरधने यांनी परिश्रम घेतले.प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी केले. संचालन योगीता राऊत यांनी केले. उपस्थितांचे आभार आशा दखने यांनी मानले.