रासेयोमुळे समाजसेवा व राष्ट्रसेवा करण्याची संधी मिळते-सिने अभिनेता कबीर दा

0
13

गोंदिया,दि.29 – राष्ट्रीय सेवा योजनेचा प्रारंभ करण्यासंंबंधीची संकल्पना ही महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांची आहे. महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय युवकांनी देशातील लोकांच्या सेवेसाठी काही रचनात्मक कार्य केले पाहिजे या योजनेमुळे महाविद्यालयीन युवकांना समाजसेवा आणि राष्ट्रसेवा करण्याची संधी मिळत आहे असे प्रतिपादन मुंबईचे सिने अभिनेता व डायरे्नटर कबीर दा यांनी एनएमडी महाविद्यालयात आयोजित एनएसएस स्थापना दिनानिमित्त केले. गोंदिया शिक्षण संस्थाद्वारा संचालित नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस कार्यक्रम प्राचार्या रजनी चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनात २४ व २५ सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २४ सप्टेंबर रोजी स्वच्छ भारत अभियानअंतर्गत महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता मिशन कार्यक्रम राबविला. २५ सप्टेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ प्राध्यापक सिद्धार्थ रामटेके होते तर प्रमुख अतिथी म्हणून ङ्किल्म अभिनेता, डायरे्नटर व लेखक कबीर दा, युवा कवी व साहित्यीक उदय चक्रधर, डॉ.एस.यु.खान, प्रा.राकेश खंडेलवाल, रासेयो गोंदिया जिल्हासमन्वयक प्रा.बबन मेश्राम, डॉ.दिलीप जेना, डॉ.अर्चना जैन, डॉ.भुमिका ठाकूर, डॉ.मस्तान शहा उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणातून डॉ.सरीता उदापुरकर यांनी रासेयोचे महत्व विषद केले तर कवी उदय चक्रधर यांच्या ‘तुझ्या माझ्या प्रेमाची गावभर झाली चर्चा-सांग सखे तुझ्या घरावर केव्हा आणू मोर्चा‘ या कवीतेने सभागृहातील संपूर्ण श्रोते भारावून गेले. त्यानंतर रासेयोच्या स्वयंसेवकांनी समाजप्रबोधनात्मक सांस्कृतिक नृत्य व नाटकातून सभागृहातील उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाचे संचालन डॉ.संजय जगने यांनी तर आभार वरिष्ठ स्वयंसेवक योगेश खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो सहा कार्यक्रम अधिकारी प्रा.रवी रहांगडाले, संजय लिल्हारे, रोशन सराते, ज्योती दमाहे, किरण लिल्हारे, सिमा राऊत,संगिता भुरे, मनिषा मरसकोल्हे, वैशाली हरिणखेडे, आकाश नागपुरे, वंशिका शर्मा, प्रगती मेश्राम, निशांत वहाणे, ममीता पाचे, अंकित भालाधरे, पुजा उके, राखी पटले, श्याम नागज्योती, वैभव शहारे, प्रतिक सोनवाने, खुशाल हरिणखेडे, विठ्ठल हरिणखेडे, पुजा मंडिये,ज्योती कांबळे, अश्वीनी मंडिये, सविता ठाकरे, गिरीश मदनकर देवेंद्र ठाकरे, यादोराव केवट यांनी अथक परिश्रम घेतले.