एकोडी शाळेत विजकोसळून 10 विद्यार्थी जखमी,तिरोड्यात दोघांचा,यवतमाळात चौघांचा मृत्यू

0
19

गोंदिया,दि.05-गोंदिया तालुक्यातील एकोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दुपारच्यासुमारास झालेल्या मेघगर्जनेसह पडलेल्या विजेमुळे वर्गातील  विद्यार्थांवर वीज पडल्याने 10 विद्यार्थी जखमी झाले.तर तिरोडा तालुक्यातील बोरा येथे बाबा भाऊलाल बिसेन व गांगला येथे खोडगाव निवासी जगदिश झनक नागपूरे यांचा विज पडल्याने मृत्यू झाला आहे.काही विद्यार्थ्यांना किरकोळ इजा झाल्याचे सांगितले.४ थ्या वर्गात ४७ विद्यार्थी हे हजर होते.त्यापैकी २ विद्याथ्र्यांना मोठ्या स्वरुपात तर ८ विद्याथ्र्यांना किरकोळ जखम झाली आहे.शाळा ही कौलारू असल्याने विद्याथ्र्यांच्या अंगावर कवेलू पडल्याने ते जखमी झाले.त्यामुळे वर्गात एकच गोंधळ उडाला.वर्गाच्या qभतीवर सर्वच फलक,फोटो हे कोलमडून पडले.तर शाळेतील विजेच्या तारा सुध्दा जळाल्या आहेत.वर्ग शिक्षक के.के.हरिणखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आलेल्या पावसासोबतच विजकडाडली.विजेमुळे जखमी झालेल्या विद्यार्थामध्ये रेहान कलाम शेख,अर्पीत हेतराम पटले यांना अधिक जखम असून साक्षि अशोक ढोमणे,दुर्गेश सुरेश टेंभरे,आर्ची नंदकिशोर बिसेन,शिखा मोहनलाल बावनकर,विक्की संजय रहागंडाले,लव गिरधारी हरिणखेडे यांना किरकोळ जखम झाली आहे.या सर्वावंर एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.डॉ.एन.जी.अग्रवाल व त्यांचे सहकारी सर्व विद्याथ्र्यांची काळजी घेत उपचार करीत आहेत.या घटनेमुळे मुख्याध्यापक व इतर शिक्षकामध्ये भितीचे वातावरण दिसून येत आहे.सर्व विद्यार्थ्यांवर उपचार करुन घरी पाठविण्यात आले आहे.

वीज पडून चौघांचा मृत्यू तर एक गंभीर

 यवतमाळ-– जिल्ह्यातील कळंब तालुक्यात आज विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तालुक्यात शेतात काम करतांना अंगावर वीज पडून चार जनांचा मृत्यु व एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. निमगव्हाण येथील महिला मंजुळा चंद्रभान राऊत वय ६५ हिचा मृत्यू झाला असून, सुमित्रा मानिक अंबाडेरे वय ५५ हि गंभीर जखमी झाली आहे. तसेच तालुक्यातील आमला येथील शेतात काम करतांना चंदा शंकर रामगडे वय ५५, तेजस्विनी शंकर रामगडे वय २३ व मदन पुरूषोत्तम कुमरे वय २५ यांचा मृत्यु झाला आहे.