ओबीसी विद्यार्थ्यांची तात्काळ शिष्यवृत्ती द्या-रुचित वांढरे

0
10

गडचिरोली,दि.14ः- ओबीसी समाजातील माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकारकडून शिष्यवृत्ती दिल्या जाते. मात्र सत्र ( २०१5-१६ , २०१६-१७ व २०१७- २०१८ ) अश्या तीनही वर्षांची शिष्यवृत्ती, फ्री- शिपची रक्कम अद्यापही राज्यसरकारने विद्यार्थ्यांना न दिल्याने शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे.काहींनी तर शिष्यवृत्तीची रक्कम न मिळाल्याने शिक्षण पुर्ण करु शकत नाही तर पुढच्या वर्षात महाविद्यालयाने प्रवेश नाकारल्याने आत्महत्या कराव्या लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत.पुरोगामी महाराष्ट्र म्हणून मिरवणार्या महाराष्ट्राला हे शोभणारे नसून ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तत्काळ द्यावी अन्यथा गडचिरोली जिल्ह्यात मोठे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचा अध्यक्ष रुचित वांढरे यांनी दिला आहे. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना तात्काळ २० जानेवारी २०१८ च्या आत शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी अशी मागणी केली आहे.२० जानेवारी २०१८ च्या आत शिष्यवृत्ती न दिल्यास राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ गडचिरोली जिल्ह्यातील १२ ही तालुक्यात आंदोलनाचा इशारा दिला आहे.